Manisha Art

Self taught artist...learning and learning

जुने वर्ष………..

जुने वर्ष………..

 

खरेतर आपले नविन वर्ष पाडव्याला सुरु होते. पण आता सर्रास सगळेजण ३१ डिसेंबरलाच नविन वर्ष समजतात. अर्थात हे काहि नविन पिढिला उद्देशून नाही. आबालवृध्द सर्वांसाठी आता हा नविन सण झाला आहे.

nirop2वर्षाच्या शेवटच्या क्षणाची हुर हुर काहि वेगळीच असते. सगळ्यांच्या वेगवेगळ्या आखण्या असतात. प्रत्येक जण वर्षभरापेक्षा काहि तरी वेगळे करण्याची धडपड करत असतात. ऑफ़िसच्या किंवा सोसायटिच्या मित्रमंडळीचे, नातेवाइकांचे एकमेकांसोबत आनंद वाटून घेतात. काही वर्षाच्या शेवटच्या क्षणी दंगामस्ती साठी राखतात. त्यासाठी हॉटेल्स,बीच रिसॉर्ट , पब्स आरक्षण केले जाते.

एखादा पाहुणा जाताना, आपल्याला हातातून काही निसटून जाते हि एक न बोलता समजली जाणारी पारंपारीक भावना. पाहुणा आपल्याकडे आल्यावर जी आपली स्थिती असते, तीच स्थिती आपण कोणाकडे पाहुणे म्हनुन जातो, तेव्हा त्याची स्थिती अशीच असते. एवढेच काय, प्रवासामध्ये थोड्यावेळात सहप्रवाश्याबद्दल असेच काहिसे घडते. माहेरवाशीण सासरी गेल्यावर तिच्या माहेरच्या माणसाना घर खायला उठते. मित्र-मैत्रिणींची ताटातूट होते तेव्हा त्यांची विरहाने अशीच अवस्था होते.गणपती अकरा दिवसाचे असो कि दिड दिवसाचा, विर्सजनाच्यावेळीआपले मन भरुन येते. बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करतो.

मग आपल्यला ३६५ दिवस साथ करणाऱ्या वर्षासोबत आपण असे का करतो? ज्या वर्षाने प्रत्येक दिवसाच्या काही आठवणी दिलेल्या असतात,काही खास क्षण दिलेले असतात, जे आपल्याबरोबर कायम राहणार असतात. अश्या जाणाऱ्या वर्षासोबत आपण असे कृतघ्न का होतो? त्याच्या जाण्याने मन व्यथीत होत नाही, एवढे आपण नविन वर्षामध्ये कसे गुंततो? कि आपली पारंपारीक मानसिकता बदलते आहे?

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *