Manisha Art

Self taught artist...learning and learning

आंजर्ले – हर्णे

आंजर्ले – हर्णे

आंजर्ले येथील  संस्कार-भारती निवासी वर्गाच्या  दुसऱ्या  दिवशी , आम्ही हर्णे बंदरावर गेलो. आंजर्ले वरून साधारण अर्धा – पाउण तासात आपण हर्णेला  पोहचतो. आंजर्ले व हर्णे  गावांना जोडणारा पूल  हा देखील तितकाच देखणा आहे. खाडीत उभी असलेल्या होड्याना कैमेऱ्यात टिपण्याचा मोह मी आवरू नाही शकले. चालत्या बसमधुन काढलेले फोटो तितकेसे छान नाही आले, पण बोलके नक्कीच आहेत. हर्णे किनारा हा पांढरा शुभ्र ,स्वच्छ असून  गजबजाटि पासून अजूनतरी दूर आहे. सर्वसाधारण  किनाऱ्यावर  चित्रकारांना उन्हांत त्रास होण्याची शक्यता असते.  तसेच इथे पण सावलीची जागा सापडणे कठीण असल्यामुळे , उन्ह वाढायच्या अगोदर चित्रे काढणे सोयीचे पडते.

आंजर्ले - हर्णे जोडणारा पूल

आंजर्ले – हर्णे जोडणारा पूल

मस्तच ...भन्नाट

मस्तच …भन्नाट

चालत्या बसमधुन काढलेले फोटो

चालत्या बसमधुन काढलेले फोटो

हर्णे एक विहंगम दृष्य

हर्णे एक विहंगम दृष्य

हा हर्णे बंदरातील बाजार.  इथे  १२ वाजे पर्यन्त कोळी बांधवांची  आणि मासे खरेदी करणाऱ्यांची वर्दळ असते. थेट कोचीन , मुंबई , पुण्यापर्यन्त इथून मासे नेले जातात.  आम्ही हर्णे किनाऱ्यावर पोहचलो तेव्हा बैलगाड़ी, रिक्षा, स्कुटर, सायकल अशा बऱ्याच  दोन-चार  चाकी वाहनांची ये-जा चालु होती. एका ठिकाणी नजर गेली , जिथे कोळी बांधवांनी सगळे नांगर  असे गुंडाळून ठेवले होते. सागर किनाऱ्यावर पोहचल्यानंतर सगळ्या गोष्टी अशा  बासनात बांधून  समुद्रकिनाऱ्यावरील आनंद मनमुराद लुटा असे हे आम्हाला सुचवत  होते.

हर्णे बंदरातील बाजार

हर्णे बंदरातील बाजार

17

हर्णे बंदर

हर्णे बंदर

हर्णे बंदर

हर्णे बंदर

एका सेमिनार मध्ये रवि जाधव ह्यांनी नटरंग चा धमाल किस्सा सांगितला होता  चित्रपटातील गाण्याचे  lip-synch करणे हे कुठल्या हि अभिनेत्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. पण दिग्दर्षक म्हणुन त्याला स्वत:ला असे वाटत होते की “खेळ मांडला “हे गाणे अतुल कुळकर्णी ह्याने lip-synch केले तर गाणे उठावदार होणार नाही. म्हणून रविसरांनी वेळोवेळी अतिरिक्त शॉट घेतले. अतुल कुळकर्णी ह्यांना जराहि कल्पना नव्हती की, त्यांच्या नकळत गाणे रेकॉर्ड केले जात आहे. असाच काहीसा  किस्सा मी काठलेल्या ह्या फोटोंचा आहे. कडयावरील गणपतीच्या मंदिरा कडून आम्ही सर्व खाली उतरत आहोत. हि जरा आगळी वेगळी आठवण ! ह्यातील गंमत जास्त काही लिहिले तर निघून जाईल. फोटोतील सर्वांना त्यांच्या मस्त अदाकारी बद्दल धन्यवाद!

1

4

2

त्या दिवशी मला गणपतीचे दर्शन नाही झाले , पण शेवटच्या दिवशी मी खास मंदिर पाहण्यास गेले माघी गणपति उत्सवा निमित्त मंदिराची रंगरंगोटी चालु होती.उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती  आणि अतिशय स्वच्छ गाभारा मनाला मोहवणारा होता.

71

गणपतीची पाऊले

कड्यावरचा गणपति ,आंजर्ले

कड्यावरचा गणपति ,आंजर्ले

 

समाजव्यवस्था आणि कला यांची बांधिलकी , कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा सणांशी असलेला संबध अशा बर्याचशा क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टींची माहिती संध्याकाळी शैलेश भिंडे सरांनी  अलगद उलगडून सांगितली . त्यानंतर  सर्वांनी आपापल्या  चित्रांचे सादरीकरण केले.  त्यात आवश्यक अशा सुधारणा तसेच इतर मोलाचे मार्गदर्शन गणेश हिरे सरांनी केले. तिसऱ्या दिवशी  गावातच निसर्गचित्रणाचा आनंद घेतला. आणि संध्या काळी ४ वाजता परत मुंबईच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. संस्कार भारतीच्या सर्व प्रमुखांना असा  नितांत सुंदर अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *